Advertisement

जाणून घ्या, कोण आहेत डॉ. सुहास पेडणेकर?

अथक परिश्रम, उपाशीपोटी केलेली ज्ञानसाधना आणि शिक्षणाप्रती असलेली आस या जोरावर डॉ. पेडणेकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. तसंच त्यांनी आतापर्यंत शिक्षक, संशोधक मार्गदर्शक, विविध सरकारी संस्था यांसारख्या विविध क्षेत्रात प्रमुख म्हणून काम केलं आहे.

जाणून घ्या, कोण आहेत डॉ. सुहास पेडणेकर?
SHARES

रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसंच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अथक परिश्रम, उपाशीपोटी केलेली ज्ञानसाधना आणि शिक्षणाप्रती असलेली आस या जोरावर डॉ. पेडणेकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. तसंच त्यांनी आतापर्यंत शिक्षक, संशोधक मार्गदर्शक, विविध सरकारी संस्था यांसारख्या विविध क्षेत्रात प्रमुख म्हणून काम केलं आहे.


आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पेडणेकर यांनी अमेरिकेतील 'स्टिव्हन्स इन्सिटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' इथं 'ग्रीन केमिस्ट्री' या विषयात डॉक्टरेट मिळवली केली आहे. त्याशिवाय उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानबद्दल त्यांना २०१२ साली महाराष्ट्र शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना उत्कृष्ट रसायनशास्त्र शिक्षक म्हणूनही गौरविण्यात आलं असून टाटा केमिकल्स, असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री आणि सीआयआय या संस्थांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ते गेली २८ वर्षे 'ऑर्गनिक केमिस्ट्री' हा विषय शिकवत असून 'ग्रीन केमिस्ट्री' हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.


महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात योगदान

डॉ. पेडणेकर यांनी राज्य सरकारच्या विविध समित्यांवर काम केलं असून महाराष्ट्र विद्यापीठ कायदा२०११ च्या अभ्यास समितीमध्येही त्यांचा सहभाग होता. त्याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समधून त्यांचे ३१ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसंच अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, रशिया, फ्रान्स, नेदरलॅंड, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, ब्राझील या देशात त्यांचे उच्च शिक्षणाबाबत महत्त्वाचे ८ शोधनिंबध प्रकाशित झाले आहेत.


सामाजिक क्षेत्रातही योगदान

प्राचार्य म्हणून त्यांनी १३ नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम व आयसीटीच्या अभ्यासाचीही सुरूवात केली आहे. फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डॉ. सुहास पेडणेकर यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी 'सेल्फ व्हिजन सेंटर'ची सुरूवात केली असून त्यांनी 'आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक व्यक्तींंनी एका आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलाला दत्तक घ्या' ही योजना सुरू केली. तसंच समाजातील वंचित घटकातील लहान मुलांकरिता झोपडपट्टी अभ्यास केंद्र सुरू केलं.


सध्या कुठे कार्यरत?

डॉ. पेडणेकर हे अमेरिकन केमिकल सोसायटी, इंडियन सायन्स काँग्रेस, इंडियन केमिकल सोसायटी,विज्ञानभारती आणि रोटरी क्लब या संस्थांचे पदाधिकारी आहेत. तसेच ते भारतीय नियोजन आयोग (नीती आयोग), विद्यापीठ अनुदान आयोग ( युजीसी), राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता आयोग (नॅक) तसंच महाराष्ट्र राज्य, केंद्र व राज्य सरकारने गठित केलेल्या विविध उच्च शिक्षण समितीचे सदस्य आहेत.



हेही वाचा-

डाॅ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा