चाइल्ड लाइन संस्थेकडून बेघर मुलांना मार्गदर्शन


  • चाइल्ड लाइन संस्थेकडून बेघर मुलांना मार्गदर्शन
  • चाइल्ड लाइन संस्थेकडून बेघर मुलांना मार्गदर्शन
SHARE

जोगेश्वरी - बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाजवळ रस्त्यावर राहणारी बेघर मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये याकरता सीसीडीटी चाइल्ड लाइन या संस्थेतील लता परब, दीपक काळे, विशाल सोनी या सदस्यांनी बेघर कुटुंबातील मुख्य व्यक्तिला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलंय. शिक्षण का महत्त्वाचं आहे, शिक्षणामुळे काय फायदा होतो, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सदस्यांनी मार्गदर्शन केलं. या बेघर कुटुंबातील सर्व मुलांची माहिती घेवून तिथल्या मुलांना महापालिका शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दीपक काळे यांनी सांगितलं.

सीसीडीटी चाइल्ड लाइन ही संस्था गेल्या काही वर्षापासून हरवलेली मुले, अत्याचार ग्रस्त मुले, पळून गेलेली मुलं, वेशाव्यवसायात असलेली मुलं, अनाथ आणि रस्त्यावर राहणारी मुलं या सर्व मुलांची काळजी घेण्याचं आणि संरक्षण देण्याचं काम या संस्थेतर्फे केलं जात. अशा अनाथ मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम तसेच बेघर मुलांना शेल्टर होममध्ये संरक्षण देण्याचं काम या संस्थेद्वारे केलं जातं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या