Advertisement

अंधेरीच्या राजहंस विद्यालयात साकारलं पहिलं वैज्ञानिक केंद्र


अंधेरीच्या राजहंस विद्यालयात साकारलं पहिलं वैज्ञानिक केंद्र
SHARES

नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र या केंद्र सरकारच्या शैक्षणिक सुविधेचा लाभ मिळवण्याचा प्रथम मान अंधेरीच्या राजहंस विद्यालयाला प्राप्त झाला. या केंद्राचं उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्य मंत्री सत्यपाल सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 'अटल टिंकरिंग टॅब' योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. शालेय विद्यार्थ्यांना असलेली जिज्ञासा. गणित व विज्ञानातील नवनव्या प्रयोगांचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध व्हावा, यासाठी या विज्ञान केंद्राची स्थापना झाल्याचं मत यावेळी सत्यपाल सिंह यांनी केलं.


डिजिटल इंडियासाठी

केंद्र सरकार फक्त सीबीएसई शाळांना नव्हे, तर राज्य सरकारच्या शाळांनाही नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी साहाय्य करणार आहे. यासाठी विशेष तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आहे. परीसरातील इतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनाही वैज्ञानिक प्रयोगशाळा वापरण्यास मुभा असणार आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळांनाही या उपक्रमाचा फायदा होणार आहे.


शाळाबंदीवर चुप्पी

केंद्र सरकार एकीकडे शैक्षणिक सोई उपलब्ध करून देत असताना राज्य शासन शाळा बंद करण्याचं धोरण राबवत आहे. शासनाच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ८० हजार शाळा बंद करण्याच्या मतप्रदर्शनावर विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना सत्यपाल सिंह यांनी सांगितलं की हा राज्य सरकारचा विषय आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील. शिक्षण सचिवांवर अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा