बारावीचा मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

 Mumbai
बारावीचा मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई - बोर्डाची परीक्षा सुरू झाली की, पेपर फुटणं हे आता काही नवीन नाही. गुरुवारी बारावीचा मराठीचा पेपर होता. 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाला. 10.30 वाजताच मुलांना वर्गात सोडण्यात आलं होतं. 10 वाजून 50 मिनिटांनी मुलांच्या हातात पेपर देण्यात आले. मात्र प्रश्नपत्रिका हाती येण्याआधीच 10 वाजून 46 मिनिटांनी पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पेपर नक्की कुणी लिक केला, याबाबत साशंकता आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळ अधिक तपास करत आहेत. मुंबईत यंदा 1 लाख 20 हजार मुलांनी मराठीचा पेपर दिला.

Loading Comments