इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईने (IIM mumbai) नवी मुंबईत आर्थिक व वित्तीय शिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव आयआयएमने राज्य सरकारकडे सादर केला आहे.
या केंद्राच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रातील प्रशिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मूळ उद्देश आहे. तसेच, उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित व्यावसायिक आणि घडवून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याची तयारी संस्थेने दाखवली आहे.
आयआयएम मुंबईचा दुसरा दीक्षांत समारंभ शनिवारी 20 सप्टेंबर रोजी पार पडला. या समारंभात ही घोषणा करण्यात आली. या वेळी व्हिजनरी लीडर्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग कार्यक्रमाच्या सातव्या बॅचमधील 932 पदव्युत्तर विद्यार्थी, 31 पीएचडी विद्यार्थी आणि 25 पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत.
या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जागतिक अर्थव्यवस्थेतील (world economy) आव्हानांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. व्यापार युद्धे, भू-राजकीय तणाव आणि तांत्रिक अडथळे यांचा उल्लेख करत त्यांनी बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले.
आयआयएम मुंबईने नवी मुंबईत (navi mumbai) वित्तीय शिक्षणाचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज तसेच इतर वित्तीय संस्थांशी समन्वय साधण्यात येत आहे.
केंद्रात अल्पकालीन व दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची योजना आहे. फिनटेक, ट्रस्ट मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा यासारख्या नव्या काळातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे आयआयएम मुंबईचे (mumbai) संचालक मनोज तिवारी यांनी सांगितले.
हेही वाचा