Advertisement

आयआयपीच्या करिअर महोत्सवाला उत्तम प्रतिसाद


आयआयपीच्या करिअर महोत्सवाला उत्तम प्रतिसाद
SHARES

अंधेरी - पॅकेजिंग उद्योगातील नोकरीच्या संधी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील यासाठी भारतीय पॅकेजिंग संस्था (आयआयपी) च्या वतीने आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील संस्थेच्या सभागृहात शनिवारी एका करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात नॅशनल कॉलेज, जेव्हीएम मेहता कॉलेज, शहा कॉलेज, व्हीआयव्हीए कॉलेज या महाविद्यालयांतील 200 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

पॅकेजिंग हा करिअरसाठी उत्तम पर्याय असून, दिवसेंदिवस हा उद्योग झपाट्याने वाढीस लागला आहे. यामुळे पॅकेजिंगचा दर्जा आणि विकास वाढविण्यात मदत करणाऱ्या तज्ज्ञ आणि प्रशिक्षित व्यवसायिकांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आयआयपी या देशातील एकमेव संस्थेने पॅकेजिंग प्रशिक्षण आणि पॅकेजिंग उद्योगातील विदयार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सिद्ध करण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरु केल्याचे संस्थेचे संचालक डॉ. एन. सी. साहा यांनी सांगितले असून आतापर्यंत पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या संस्थेची पदवी प्राप्त केली आहे. त्यापैकी प्रत्येकाला या अभ्यासक्रमानंतर भारतात आणि परदेशातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदांवर नोकरी मिळाली आहे. या कंपन्यांमध्ये अॅबट लॅबोरेटरीज, मॉण्डेलीझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, डाबर इंडिया लिमिटेड, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड, कोका कोला इंडिया इन्कॉर्पोरेटेड आदी कंपन्यांचा समावेश आहे, असेही साहा यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा