Advertisement

'ब्रिक्स'च्या टॉप १० यादीत आयआयटी बॉम्बे


'ब्रिक्स'च्या टॉप १० यादीत आयआयटी बॉम्बे
SHARES

भारतातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या 'आयआयटी बॉम्बे'ने क्वाक्वॅरेली सायमंड्स (क्यूएस)च्या 'ब्रिक्स' (ब्राझिल, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका) देशांतील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत नववं स्थान पटकावलं आहे. यापूर्वी आयआयटी बॉम्बे १० स्थानावर होतं. 


नेहमीच सर्वोत्तम प्रदर्शन

भारतीय विद्यापीठांमध्ये 'आयआयटी बॉम्बे' ही शैक्षणिक संस्था नेहमीच उच्च स्थानावर राहिली आहे. याचप्रमाणे भारतातील आयआयएससी बंगळुरू, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मद्रास या शैक्षणिक संस्थांनी २०१६ प्रमाणे यंदाही ब्रिक्सच्या सर्वोत्तम २० शैक्षणिक संस्थाच्या यादीत स्थान मिळवलं आहे. तर चीनच्या शिंघ्वा, पिकिंग आणि फुडान या विद्यापीठांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. 'आयआयटी बॉम्बे'ला १०० पैकी एकूण ८३.६ गुण मिळाले आहेत.


आयआयटी बॉम्बेची एकूण गुणसंख्या

  • शैक्षणिक प्रतिष्ठा - ९८.१
  • कर्मचाऱ्यांची प्रतिष्ठा - ९९.७
  • प्रत्येक विद्यार्थ्यांमागे असलेलं शिक्षकांचे प्रमाण - ४७.८
  • पीएचडी शिकवणाऱ्या शिक्षकांसह इतर - ९६.९
  • इतर संस्थांकडून मिळालेली गुणसंख्या - ५३.६
  • प्रति शिक्षकाला मिळालेले गुण - ९५.४
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षकांना मिळालेले गुण - १५.४
  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी - ७.६


७ विद्यापीठांची उत्तम कामगिरी

ब्रिक्स देशांमध्ये एकूण ३५० विद्यापीठे आहेत. त्यात भारतातील खासगी आणि शासकीय अशा ७९ विद्यापीठांचा समावेश आहे. या यादीत भारतातील ७ विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट ५० च्या यादीत स्थान मिळवलं आहे, अशी माहिती बुधवारी विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी) चे अध्यक्ष व्ही. एस. चौहान यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी जी शैक्षणिक संस्था निवडली आहे, ती किती दर्जेदार आहे हे जाणून घेण्यास यामुळे मदत होणार आहे. याचसोबत भारतीय शैक्षणिक संस्थांना अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी २०१६ मध्ये राष्ट्रीय नामांकन नियमावली संस्था सुरू करण्यात आली आहे.

ब्रिक्सच्या क्रमवारीत भारतातील १५० शैक्षणिक संस्थांचा समावेश व्हावा, अशी इच्छाही चौहान यांनी व्यक्त केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा