Advertisement

डिग्रीअाधीच अायअायटीच्या विद्यार्थ्याला १.३९ कोटींची नोकरी


डिग्रीअाधीच अायअायटीच्या विद्यार्थ्याला १.३९ कोटींची नोकरी
SHARES

अायअायटी बाॅम्बे इथं झालेल्या प्लेसमेंटदरम्यान मायक्रोसाॅफ्टनं अायअायटीच्या एका विद्यार्थ्याला चक्क १.३९ कोटींची अाॅफर दिली अाहे तर अॅपवर अाधारित टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या उबेरनं एका विद्यार्थ्याला एका वर्षाकाठी ९९.८७ लाख रुपयांची अाॅफर दिली अाहे.
मायक्रोसाॅफ्टनं या विद्यार्थ्याला वर्षाला २,१४,६०० डाॅलरची अाॅफर दिली असून उबेरनं १,५५,००० डाॅलरची अाॅफर दिल्याचं प्लेसमेंट विभागातील सूत्रांनी सांगितलं. शुक्रवारी दोन सत्रात चाललेलं हे प्लेसमेंट शिबीर शनिवारी चक्क पहाटे दोन वाजेपर्यंत चाललं होतं.



१७ कंपन्यांचा सहभाग

या प्लेसमेंट शिबिरात सहभागी झालेल्या १७ कंपन्यांनी ५२ जणांना नोकरीची अाॅफर दिली. गोल्डमॅन सॅच्सने अाठ जणांना तर बाॅस्टन कन्सल्टिंग ग्रूपने सात जणांना नोकरीची अाॅफर दिली. या शिबिरात टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स इंक, माॅर्गन स्टॅनले, ड्यूएश बँक, प्राॅक्टर अँड गॅम्बल, मिल्लेनियम अाणि अायटीसी ग्रूप या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा