Advertisement

यंदा ११वी प्रवेशासाठीची स्पर्धा आणखी चुरशीची होणार

११वी प्रवेश यंदा १०वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या निकालवरच होणार असल्यानं ११वी प्रवेशासाठीची नामांकित महाविद्यालयातील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.

यंदा ११वी प्रवेशासाठीची स्पर्धा आणखी चुरशीची होणार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा उशिरानं १०वीच्या विद्यांर्थ्यांचा निकाल लागला. या निकालात अनेक विद्यार्थ्याना चांगले टक्के मिळाले आहेत. त्यामुळं ११वी प्रवेश यंदा १०वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या निकालवरच होणार असल्यानं ११वी प्रवेशासाठीची नामांकित महाविद्यालयातील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.

मुंबई विभागात राज्य मंडळाच्या १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत तर ३६ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. यात आयसीएसई मंडळाचा राज्याचा १०वीचा निकालही १०० टक्के आणि सीबीएसई मंडळाचा पुणे विभागाचा निकालही ९० टक्क्यांवर लागल्याने या स्पर्धेला धार येणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या २ ते ३ गुणवत्ता याद्यांचा कट ऑफ ९० टक्क्यांच्या खाली येणे अवघड असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून दहावीच्या निकालावरच अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली. मात्र यंदाची दहावीच्या निकालाच्या उच्चांकाची आकडेवारी पाहता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसमोर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांचे नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठीचे मोठे आव्हान आहे.

४५ ते ६० टक्क्यांदरम्यान राज्य मंडळाचे तब्बल ७९ हजार ५८७ विद्यार्थी आहेत. नामांकित महाविद्यालयाचे प्रवेश नव्वदीपारच पूर्ण होतील. मात्र इतर ठिकाणीही प्रवेश मिळविताना या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता काही प्राचार्य व्यक्त करीत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा