Advertisement

विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाच्या इमारतीचे २ सज्जे बुधवारी ४.३० च्या सुमारास कोसळले. सुदैवाने यात कोणालाही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. परंतु विद्यापीठ प्रशासनान यावर कोणतीही कारवाई न करता चालढकल करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
SHARES

मुंबई विद्यापीठात एकाबाजूला परीक्षा आणि निकाल गोंधळ सुरू असताना दुसरीकडे विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसची अवस्थाही दयनीय होत चालली आहे. महिन्याभरापूर्वी विद्यापीठात राहणाऱ्या मुलांची मेस अचानक बंद झाल्याने खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत. त्यातच भर म्हणून या विद्यार्थ्यांसह आंतरराष्ट्रीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडेही विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होताना दिसत आहे.


नेमकं प्रकरण काय?

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाच्या इमारतीचे २ सज्जे बुधवारी ४.३० च्या सुमारास कोसळले. सुदैवाने यात कोणालाही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. परंतु विद्यापीठ प्रशासनान यावर कोणतीही कारवाई न करता चालढकल करण्यात येत आहे.



सोयीसुविधांकडे दुर्लक्ष

मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची इमारत फार जुनी असून गेल्या कित्येक वर्ष इमारतीला रंगकामही झालेलं नाही. या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसुविधाकडं दुर्लक्ष केलं जात आहे. परंतु त्यात राहणारे विद्यार्थी परदेशी असल्याने भाषेच्या अडचणीमुळे त्यांना तक्रार करता येत नाही.



तरीही काही विद्यार्थ्यांनी प्रशासनाला पत्रव्यवहार करून तक्रार दाखल केल्या. त्यावर तात्पुरता सोय म्हणून विद्यापीठ प्रशासनान काही ठिकाणी जाळी व कापड बसवण्याच काम केलं. परंतु त्यानंतरही बुधवारी या वसतिगृहाच्या आठव्या व नवव्या मजल्यावरील सज्जे कोसळले. हे सज्जे कोसळल्यानंतर खाली लावलेल्या कापडाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या.



खोल्यांना गळती

या शिवाय या वसतिगृहात इमारतीच्या प्लास्टरचे तुकडे सातत्याने कोसळत असतात. त्याशिवाय वसतिगृहाच्या इतर परिसरात कोसळलेल्या भागांचा कचरा, तुटलेले पाइप्स पसरलेले आहेत. याशिवाय खोल्यांचे रंग उडाले आहेत, खोल्यांमध्ये पावसाच्या वेळी ओल येते. काही खोल्या गळत आहेत. विद्यार्थ्यांचे झोपण्याचे पलंग, कपाटे सुस्थितीत नाहीत, वसतिगृहातील वायफाय सुविधा गेले वर्षभर बंद आहे. अशा तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. मात्र या तक्रारींकड विद्यापीठाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.



वसतिगृहातील या इमारतीची तात्पुरती दुरूस्ती न करता, त्यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. तसंच या परिसराची स्वच्छता राखण्यात यावी, अशा मागण्या विद्यापीठाकडे केल्या आहेत.
- सौमित साळुंखे, लॉ विद्यार्थी


यासंदर्भात 'मुंबई लाइव्ह'ने वसतिगृहात राहणाऱ्या वाॅर्डनशी संपर्क साधला असता, सध्या आम्ही तेथे राहणाऱ्या सर्व मुलांची तात्पुरती सोय केली आहे. माझ्या अगोदर असणाऱ्या वाॅर्डनने कोणतेही सोय केली नव्हती. परंतु मी तात्पुरती जाळी बसवली आहे. हे मुख्यत्वेकरून इंजिनिअरचं काम असून तुम्ही इंजिनिअरला संपर्क साधा, असं सांगत त्यांनी हात झटकले.



हेही वाचा-

खासगी शाळांतील शिक्षक भरती अाता सरकारकडून

सूचनांद्वारे बनणार विद्यापिठाचा बृहत आराखडा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा