Advertisement

विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचं काम पूर्ण!

ठाण्यापलिकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं मुंबई विद्यापीठाचं कल्याण उपकेंद्र लवकरच सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. या उपकेंद्राच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (occupation certificate) मिळालं आहे. इतर सर्व कायदेशीर सोपस्कार देखील पूर्ण झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली नसून कल्याण उपकेंद्राच्या या वृत्ताला मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांनी दुजोरा दिला आहे.

विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचं काम पूर्ण!
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचा तिढा अखेर सुटला आहे. कल्याण उपकेंद्राच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असून नुकतंच या उपकेंद्राला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी भेट दिली. यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून कल्याणचं रखडलेलं उपकेंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे.



कल्याण उपकेंद्राची पार्श्वभूमी

जवळपास २००५ पासून कल्याण जवळील विद्यापीठाच्या उपकेंद्राचा मुद्दा गाजत आहे. २०१० मध्ये कल्याणच्या गांधारे येथील उपकेंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर, त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूदही विद्यापीठ अर्थसंकल्पात करण्यात आली. त्यासाठी महापालिकेने जागाही उपलब्ध करुन दिली. २०१७ ला उपकेंद्राची इमारत बांधल्यानंतर कुलगुरू संजय देशमुख यांना पुढील कामकाजाबाबत सांगण्यात आलं. मात्र त्यांनी याकडे कानाडोळा करत फक्त आश्वासन देण्याचं काम केलं. परंतु त्यानंतर नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी याकडे लक्ष केंद्रीत करत त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.


उपकेंद्रात 'या' सुविधा

तब्बल १० एकर जागा गांधारेसारख्या मोक्याच्या जागी मिळाल्याने येथे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार विद्यापीठ प्रशासन करत आहे. २ प्रशस्त सेमिनार हॉल, ड्रॉइंग रूम, ४ वर्ग खोल्या, कॅफेटेरिया आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर, सिंथेटीक ट्रॅक, ओपन जीम, पार्किंग यांसारख्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

कल्याण येथे विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यानंतर कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या सहा तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मुंबई न गाठता कल्याणमध्येच सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली ते कर्जत आणि कसारा परिसरातील १५० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.


लवकरच सुरू होणार उपकेंद्र

ठाण्यापलीकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं मुंबई विद्यापीठाचं कल्याण उपकेंद्र लवकरच सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. या उपकेंद्राच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (occupation certificate) मिळालं आहे. इतर सर्व कायदेशीर सोपस्कार देखील पूर्ण झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली नसून कल्याण उपकेंद्राच्या या वृत्ताला मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांनी दुजोरा दिला आहे.


कल्याण उपकेंद्राच्या इमारतीला ओसी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे उपकेंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे. लवकरच त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल.
- विनोद मळाळे, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ

कल्याण उपकेंद्र सुरू झाल्यास याचा फायदा पूर्व उपनगरातील हजारो विद्यार्थ्यांना होणार असून याठिकाणी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.



हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठासह ७७८ महाविद्यालयांचं ऑडिट होणार!

मुंबई विद्यापीठाला राजमाता जिजाऊंचं नाव द्या, शिवसेनेची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा