Advertisement

मुंबई विद्यापीठाला राजमाता जिजाऊंचं नाव द्या, शिवसेनेची मागणी


मुंबई विद्यापीठाला राजमाता जिजाऊंचं नाव द्या, शिवसेनेची मागणी
SHARES

मुंबई विद्यापीठाचं नामांतर करण्याची मागणी आता शिवसेनेकडून होत आहे. शिवसेनेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी महापालिका सभागृहात ठरावाद्वारे विद्यापीठाचे नाव राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ करण्याची सूचना केली आहे. ही ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मंजुरीकरता पटलावर ठेवण्यात आली आहे.


इतर विद्यापीठांप्रमाणे

पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठ अाणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याप्रमाणे नामविस्तार करण्यात आला अाहे. त्या धर्तीवरच असंख्य विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात यावा, असं दत्ता नरवणकर यांनी स्पष्ट केलं.महाराष्ट्राच्या इतिहासात जिजाबाईचं महत्व अनन्यसाधारण आहे. जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांना राजकारणाचे पहिले धडे दिले. आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम, न्यायप्रियता,  विवेकबुद्धी अशा अनेकविध सात्विक गुणांचं बाळकडू देऊन त्यांनी महाराष्ट्राला जुलमी सत्तेपासून मुक्त केलं. अशा या थोर माऊलींचं यथोचित स्मरण महाराष्ट्रानं करणं गरजेचं आहे.

- दत्ता नरवणकर, शिवसेना नगरसेवक


विद्यापीठ आणि बदललेली नावे

  1. मराठवाडा विद्यापीठ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
  2. पुणे विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  3. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
  4. नांदेड विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
  5. नागपूर विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
  6. अमरावती विद्यापीठ- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ


सध्या देशभरात अनेक विद्यापीठांची नावे बदलण्यात आली असली तरी देखील त्या विद्यापीठांना जुन्या नावानच ओळखल जात. मात तरीही विद्यापीठ नाव बदलाचा प्रस्ताव का दिला जातो, असा प्रश्न अनेक विद्यार्थी संघटना विचारत आहे.हेही वाचा-

'आयटीआय' प्रवेशाचे वेळापत्रक का झालं रद्द? वाचा...

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा