विद्यापीठावरील मोर्चा अभाविपला महागात पडणार?

  Mumbai
  विद्यापीठावरील मोर्चा अभाविपला महागात पडणार?
  मुंबई  -  

  मुंबई विद्यापीठ परिसरात 30 ऑगस्ट रोजी काढलेला हुंकार मोर्चा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला चांगलाच भोवणार आहे. मोर्चामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत मनविसेने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कुलगुरू संजय देशमुख यांनी चौकशी केली. तसेच यामध्ये कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधीचे परिपत्रकही काढण्यात आले. तसेच यामध्ये कुणी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या 150 वर्षाच्या इतिहासात कालिना परिसराती कधीही सभा किंवा मोर्चा काढण्यात आलेला नाही. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थांचा सहभाग होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.