जोगेश्वरीच्या 'या' महाविद्यालयाचा होणार कायापालट

जोगेश्वरीच्या ईस्माईल युसुफ महाविद्यालयाचा लवकरच कायापालट होणार आहे. मे महिन्यात महाविद्यालयातील विविध कामांसाठी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी निधी मंजूर केला होता.

SHARE

जोगेश्वरीच्या ईस्माईल युसुफ महाविद्यालयाचा लवकरच कायापालट होणार आहे. मे महिन्यात महाविद्यालयातील विविध कामांसाठी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी निधी मंजूर केला होता. त्यामुळे महाविद्यालयाचा कायापालट झाला आहे. येत्या ३० नोव्हेंबरला महाविद्यालयातील या नवीन वास्तूंचे उदघाटन होणार आहे.

महाविद्यालयातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे १० कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. यातील ३ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. यात जॉगिंग ट्रॅक, भव्य रंगमंच, विद्यार्थी व कर्मचार्‍यांसाठी उपहारगृहांचा समावेश आहे. तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचे नुतनीकरण, विज्ञान इमारतीचे नुतनीकरण, कर्मचार्‍यांच्या इमारतीचे नुतनीकरण, शौचालयाचे नुतनीकरण इत्यादी कामे प्रगतीपथावर आहेत.

त्याचप्रमाणे केवळ यावर्षीच नाही, तर पुढील वर्षी देखील कॅम्पसमध्ये अनधिकृत बांधकामांना रोखण्यासाठी सुरक्षा भिंत, सुरक्षा रक्षकांसाठी केबिन तसेच महाविद्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर पाणपोई, मुलींचे वसतीगृह, वाणिज्य शाखेची नवीन इमारत, १ हजार क्षमतेचे नवीन ऑडिटोरियम, वाचनालय, मुलांसाठी कन्झ्युमर स्टोअर, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांसाठी विशेष खोली बांधण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती वव्हाळ यांनी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना दिली.


नियोजित विकासकामे

१. महाविद्यालयात जॉगिंग ट्रॅक

२. भव्य रंगमंच

३. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले उपहारगृह

४. मुलींसाठी वसतीगृहाची बांधणी

५. विज्ञान इमारतीचे नुतनीकरणसंबंधित विषय
ताज्या बातम्या