Advertisement

'वाचण्यावर भर द्या'


'वाचण्यावर भर द्या'
SHARES

माटुंगा - माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वेलिंगकर शिक्षण संस्थेत शनिवारी वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आले. वेलिंगकर इंस्टिट्युटच्या 'वुई स्कूलच्या' वतीने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात डॉ. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके मांडण्यात आली हेाती. याप्रसंगी बोलताना तावडे म्हणाले की, 'युवकांच्या मनात देशाबद्दलचं प्रेरणादायी विचार निर्माण करण्याचं काम कलाम यांनी खऱ्या अर्थानं केलं'. नजीकच्या काळात वाचन प्रेरणा दिन हा दिवस 'नो गॅझेट डे' म्हणून साजरा करावा. या दिवशी एक दिवस पूर्णपणे इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांचा वापर करू नये. केवळ युवकांनी पुस्तक वाचण्यावर भर द्यावा. व्हेलिंकर शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्थेने याबाबत पुढाकार घ्यावा. असं आवाहनीही तावडे यांनी या वेळी केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा