Advertisement

IIT प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हांस 2021 स्थगित

देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळं IIT प्रवेश परीक्षा JEE अॅडव्हांस स्थगित करण्यात आली आहे.

IIT प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हांस 2021 स्थगित
SHARES

देशभरात कोरोना (coronavirus) व्हायरसच्या प्रकोपामुळं IIT प्रवेश परीक्षा JEE अॅडव्हांस स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा कधी घेतली जाईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. जेईई अॅडव्हांस  २०२१ परीक्षा ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. ही प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

यंदा कोरोनामुळं जेईई मेन परीक्षा देखील घेण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड-१९ च्या कारणामुळं सध्याच्या महामारीच्या परिस्थितीला ध्यानात घेऊन JEE (अॅडव्हांस ) २०२१ परीक्षा जी ३ जुलै, २०२१ (शनिवारी) घेतली जाणार होती, ती स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखेची घोषणा योग्य वेळी करण्यात येईल.

देशभरात JEE Advanced 2021 परीक्षा ३ जुलै रोजी घेतली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून दिली होती. यावर्षी विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेताना ७५ टक्केची पात्रता सुद्धा शिथिल करण्यात आल्याचं देखील पोखरियाल यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी आयआयटी प्रवेशासाठी बारावी परीक्षेत ७५ टक्केची पात्रता शिथिल करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे JEE Advanced 2021 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला होता. मात्र आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

देशातील वाढत्या कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर JEE (Main) मेन २०२१ सत्रातील परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.  देशातील २३ आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced 2021 परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना JEE Mains 2021 परीक्षेला सामोरे जावे लागते. यावर्षी ४ सत्रामध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यास सवलत दिली गेली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे २०२१ या ४ सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र या परीक्षांना यंदा स्थगित केलं आहे.



हेही वाचा -

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू- नाना पटोले

हार्डवेअर, छत्र्या-रेनकोटची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा