Advertisement

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना संधी गमवावी लागू नये म्हणून यंदा चारवेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातील पहिली परीक्षा राष्ट्रीय परीक्षा कक्षाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान घेतली.

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
SHARES

आयआयटीसह इतर इंजिनीअरिंग संस्थांमधील प्रवेशासाठी देशपातळीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत महाराष्ट्रातील सिद्धांत मुखर्जी याच्यासह देशातील सहा विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाईल मिळवले आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना संधी गमवावी लागू नये म्हणून यंदा चारवेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातील पहिली परीक्षा राष्ट्रीय परीक्षा कक्षाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान घेतली. या परीक्षेचा निकाल दहा दिवसांत जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा देशभरातील ३३१ केंद्रांवर घेण्यात आली होती. त्यापैकी नऊ केंद्र परदेशातील होती. तसेच या परीक्षेसाठी ६ लाख ५२ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १ लाख ९७ हजार ७७१ मुली, ४ लाख ५४ हजार ८५२ मुले आणि ४ तृतीय पंथीयांचा समावेश होता. त्यापैकी ६ लाख २९ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

गेल्या वर्षापर्यंत ही परीक्षा ३ भाषांमध्ये घेण्यात येत होती. तर यंदा इंग्रजी, हिंदी आणि गुजरातीसह पहिल्यांदाच आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा एकूण १३ भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा