Advertisement

जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्सला लॉटरी


जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्सला लॉटरी
SHARES

मुंबई - जे.जे.स्कुल ऑफ आर्टस, फाईन आर्टस् आणि सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयांना शासकिय संस्थेत स्वायतत्ता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

या महाविद्यालयाबाबत काय निर्णय घेण्यात आलेत ते पाहू

1) स्वायत्तता प्राप्त झाल्यानंतर तीनही संस्थामध्ये स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करण्यात येईल.

2) या नियामक मंडळाच्या अध्यक्षाची नेमणूक शासनामार्फत करण्यात येणार आहे.

3) नामांकीत कलाकार, नामांकीत वास्तूशास्त्रज्ञ, वास्तूशास्त्रज्ञ क्षेत्रातील नामांकीत तज्ज्ञ यांच्यामधून अध्यक्ष निवडला जाणार आहे.

4) याचबरोबर स्वायतत्तेमुळे या संस्थांना निधी संकलित करता येईल, तसेच संस्थांना स्वत:चे उत्पन्न वाढविणे आवश्यक असल्याने या संस्था उत्पन्नाचे स्त्रोत शोधू शकतील.

5) विशेष म्हणजे शासनाचे या संस्थांना मिळणारे अनुदान पुढेही सुरु राहणार आहे.

6) या व्यतिरिक्त केवळ शासनाच्या अनुदानावर केवळ विसंबून न राहता स्वत:चे उत्पन्न वाढवून आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न या संस्थामार्फत करण्यात येणार आहे.

7) स्वायत्तता मिळाल्यानंतर सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे.

8) या तिनही संस्था सक्षम व बळकट करण्यात येणार आहेत.

9) शैक्षणिक संस्था व त्यांच्याशी संबंधित उद्योग समूहाबरोबर योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता सरकार वाढविणार आहे .

10) तिनही संस्थाना नवीन शैक्षणिक व विकासात्मक उपक्रम राबविता येणार आहे.

11) या तिन्ही संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देता येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा