Advertisement

कनिष्ठ महाविद्यालये आज बंद


कनिष्ठ महाविद्यालये आज बंद
SHARES

वारंवार झालेली आंदोलनं, आश्‍वासनं, विविध मागण्या आणि शालेय शिक्षण विभागाचा वेळकाढूपणा याच्या निषेधार्थ राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी 2 फेब्रुवारीला महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसण्याची शक्यता आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी आणि पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे राज्यात पाच टप्प्यात आंदोलन करण्यात आले. आता चौथ्या टप्प्यात २ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर आणि मुंबईत आझाद मैदान येथे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले.


प्रमुख मागण्या

  • १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे
  • २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन देणे
  • सर्व शिक्षकांना २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे
  • कायम विना अनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे
  • माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे
  • २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन द्या
  • सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा