Advertisement

'आम्हाला स्वतंत्र विद्यापीठ हवं' - कोकण विद्यापीठ कृती समितीची मागणी


'आम्हाला स्वतंत्र विद्यापीठ हवं' - कोकण विद्यापीठ कृती समितीची मागणी
SHARES

मुंबई विद्यापीठाचा कारभार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कामामुळे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी कोकण विद्यापीठ कृती समितीनं स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी केली आहे. याबाबत एक निवेदनही कृती समितीनं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडं दिलं आहे.


पत्रकार परिषदेत केली मागणी

कृती समितीतर्फे एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, माजी आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती होती. मुंबई विद्यापीठातील निकालाच्या गोंधळाचा परिणाम कोकणातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात येण्यासाठी ५५० किमीचं अंतर कापावं लागतं. त्यामुळे कोकणात स्वतंत्र कोकण विद्यापीठाची स्थापना झाल्यास कोकणातील विद्यार्थी आणि प्राध्यापक या दोघांनाही दिलास मिळेल, असंही कृती समितीकडून सांगण्यात आलं.


विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल

कोकणामध्ये रत्नागिरीत ४५, सिंधुदुर्गमधील ३८ आणि रायगडमध्ये २० अशी एकूण १०३ कॉलेजेस आहेत. या कॉलेजांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, असे मत अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे कोकण विद्यापीठ झाल्यास येथील स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. कोकणातील कॉलेजात समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, पर्यटन, जहाज वहातूक यांसारखे अनेक अभ्यासक्रम सुरू करता येतील, असं मत आमदार प्रमोद जठार यांनी मांडले.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा