Advertisement

'लॉ'चे हजारो विद्यार्थी वेटिंगवर


 'लॉ'चे हजारो विद्यार्थी वेटिंगवर
SHARES

बोरिवली - सलग सुट्ट्या आल्याने विधी महाविद्यालयाच्या प्रवेशांची चौथी यादी जाहीर करण्यात अली नाही. त्यामुळे विधी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणारे हजारो विद्यार्थी पुन्हा वेटिंगवरच राहिले आहेत. आता ही यादी गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील विधी महाविद्यालयांचे प्रवेश दरवर्षी जून-जुलैमध्येच पूर्ण होतात, मात्र या वर्षी प्रवेशातील गोंधळामुळे तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या आठ हजारांहून अधिक, तर पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या सात हजारांहून अधिक जागा अजूनही रिक्त आहेत. तीन गुणवत्ता याद्यांनंतर दोन्ही अभ्यासक्रमांकरिता आतापर्यंत केवळ 9 हजार 465 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. शेकडो विद्यार्थ्यांनी दूरच्या महाविद्यालयात नाव आल्याने आणि पसंतीच्या महाविद्यालयात नाव न आल्याने प्रवेश निश्‍चित केलेला नाही. या विद्यार्थ्यांसह तिन्ही याद्यांमध्ये नाव न आलेले हजारो विद्यार्थी चौथ्या यादीच्या प्रतीक्षेत होते.
१३ ऑक्टोबरला विधी प्रवेशाची चौथी यादी जाहीर झाल्यानंतर या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १८ ऑक्टोबरपर्यंत थेट महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे तर विधी महाविद्यालयांना १९ ऑक्टोबरला रिक्त जागांची यादी जाहीर करावी लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा