Advertisement

डी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या या तासिकांमुळे विद्यार्थ्यांना आपला अभ्यास नियमितपणे करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

डी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास
SHARES

राज्यात कोरोना (coronavirus) मुळे यंदाही शाळा (school) सध्यातरी सुरू होणार नाहीत. त्यामुळे १५ जूनपासून ऑनलाईन तास सुरू होणार आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील इयत्ता पहिली (1st) ते बारावी (12th) च्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनी (d d Sahyadri channel) वरून तासिकांचं प्रक्षेपण (lectures broadcast) करण्यात येणार आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘ज्ञानगंगा’ या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या या तासिकांमुळे विद्यार्थ्यांना आपला अभ्यास नियमितपणे करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. १४ जूनपासून सोमवार ते शुक्रवारदरम्यान रोज पाच तास इयत्तानिहाय तासिका होणार आहेत.  

कोरोनामुळे राज्यात लागू असलेल्या विविध निर्बंधामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून विद्यार्थ्यांसाठी  डी.डी सह्याद्री वाहिनीवरून तासिका होत आहेत. तासिकांचं सकाळी ७ : ३० ते दुपारी ३ : ३० या वेळेमध्ये होणार आहे. डी.डी. सह्याद्री वाहिनीवर काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता हे प्रक्षेपण होणार आहे.

प्रथम टप्प्यात दहावी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसंच बारावीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचं प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 

या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

डी.डी. सह्याद्रीचे चॅनेल क्रमांक

डी.डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या डीडी फ्रेश डिश – ५२५, डिश टिव्ही – १२२९, व्हिडिओकॉन डी २ एच – ७६९, टाटा स्काय – १२७४, हाथवे – ५१३ या चॅनेल क्रमांकावर विद्यार्थ्याना शैक्षणिक कार्यक्रमांचं प्रक्षेपण पाहता येईल.हेही वाचा -

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय

सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा