Advertisement

‘महा करिअर पोर्टल’चं उद्घाटन, ९ वी ते १२ वीच्या ६६ लाख विद्यार्थ्यांना फायदा

या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ५५६ अभ्यासक्रम व २१ हजार व्यावसायिक संस्था तसंच महाविद्यालयांची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.

‘महा करिअर पोर्टल’चं उद्घाटन, ९ वी ते १२ वीच्या ६६ लाख विद्यार्थ्यांना फायदा
SHARES

एका बाजूला शाळा कधी सुरू होणार या चिंतेत पालक आणि विद्यार्थी असताना घरबसल्या शैक्षणिक पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ‘महा करिअर पोर्टल’ (maha career portal) या संकेतस्थळाचं आॅनलाईन उद्घाटन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. याप्रसंगी शालेय शिक्षण विभाग, युनिसेफचे अधिकारी, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी असे एकूण १० हजार जण आॅनलाईन उपस्थित होते.

९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ (education department and unicef) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने हे पोर्टल बनवण्यात आलं आहे. विशेषकरून राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आॅनलाईन अभ्यासक्रम (online education) उपलब्ध करून देण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. 

हेही वाचा - अनुसूचित जातीच्या २ लाख विद्यार्थ्यांना येत्या ६ दिवसांत मिळणार शिष्यवृत्ती

 ६६ लाख विद्यार्थ्यांना फायदा

त्यानुसार ‘महा करिअर पोर्टल’ (http://mahacareerportal.com) या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ५५६ अभ्यासक्रम व २१ हजार व्यावसायिक संस्था तसंच महाविद्यालयांची (online course, education institutes and colleges) माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. तसंच अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदींचीही या पोर्टलवर विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. राज्यातील ९ वी ते १२ वीच्या तब्बल ६६ लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा फायदा होणार आहे.

विद्यार्थी सरल आयडी

विद्यार्थी सरल आयडी आणि पासवर्डचा वापर करून विद्यार्थी या महा करिअर पोर्टलवर लाॅग इन करू शकतील. ज्या विद्यार्थ्यांकडे सरल आयडी नसेल, त्यांना हा आयडी त्यांच्या संबंधित शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांशी संपर्क साधून मिळू शकतो. हा विद्यार्थी सरल लाॅग इन आयडी वापरून विद्यार्थ्यांना २७ मे २०२० पासून लाग इन करता येऊ शकेल.

फायदा घ्यावा

राज्यातील इ.९ ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांना विविध करिअर, शिष्यवृत्ती, कोर्सेस  यांची सर्वंकष माहिती या महाराष्ट्र करिअर पोर्टलवर देण्यात आली आहे. करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी केलं. 

हेही वाचा - एमबीए सीईटीचा निकाल जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा