Advertisement

अनुसूचित जातीच्या २ लाख विद्यार्थ्यांना येत्या ६ दिवसांत मिळणार शिष्यवृत्ती

राज्यातील जवळपास २ लाख अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनुसूचित जातीच्या २ लाख विद्यार्थ्यांना येत्या ६ दिवसांत मिळणार शिष्यवृत्ती
SHARES

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसंच फ्रीशिपच्या शिष्यवृत्तीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिल्याने राज्यातील जवळपास २ लाख अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या (scholarship for scheduled caste students) शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपचा (Scholarship and freeship) मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ६ दिवसांच्या आत विद्यर्थ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती जमा होईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (social justic minister dhananjay munde) यांनी दिली. 

मागणी मान्य

राज्य मंत्रिमंडळाची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक गुरूवार २१ मे रोजी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या (lockdown) काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नयं, तसंच या रकमेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली. या मागणीला अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी तात्काळ मान्यता देत, अर्थ विभागामार्फत शिष्यवृत्तीचा ४६२.६९ कोटी रुपयांचा निधी समाज कल्याण आयुक्तालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. 

हेही वाचा - १०वी, १२ वी च्या परीक्षांना केंद्राची परवानगी, पाळाव्या लागतील ‘या’ अटी

६ दिवसांत वाटप

त्यानुसार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी १ लाख ६९ हजार १७१ विद्यार्थ्यांची एकूण ३४७ कोटी ६९ लाख रुपये शिष्यवृत्ती तसंच फ्रीशिपच्या २७ हजार ८४५ विद्यार्थ्यांची ११४ कोटी रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम अर्थ विभागाने तातडीने आयुक्त, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र, यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना येत्या ६ दिवसांच्या आत ही रक्कम प्रत्यक्ष वाटप केली जाईल.

शैक्षणिक हित महत्त्वाचं

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तातडीने ही शिष्यवृत्ती देऊ केली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. 

लाभार्थ्यांना वर्ग करणार

तर, सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसंच फ्रीशिपची रक्कम विभागाला प्राप्त झाली असून, येत्या ६ दिवसांत ही रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येईल, एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, असं यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा