Advertisement

अकरावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आवडत्या काॅलेजांमध्ये प्रवेश, सरकारने घेतला जागावाढीचा निर्णय

अंतर्गत गुण रद्द केल्याने एसएससी विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आर्ट्स, काॅमर्स आणि सायन्स अशा तिन्ही शाखांच्या जागेत वाढ होणार आहे.

अकरावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आवडत्या काॅलेजांमध्ये प्रवेश, सरकारने घेतला जागावाढीचा निर्णय
SHARES

अंतर्गत गुण रद्द केल्याने एसएससी विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आर्ट्स, काॅमर्स आणि सायन्स अशा तिन्ही शाखांच्या जागेत वाढ होणार आहे. ११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतलेल्या जागावाढीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.    

आदित्य ठाकरेंची भेट

काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन अंतर्गत गुणासंदर्भात चर्चा केली होती. या चर्चेत 'एसएससीच्या विद्यार्थ्यांना अन्य बोर्डांतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत आणण्यासाठी अंतिम निकालात त्यांचे अंतर्गत गुणही ग्राह्य धरण्यात यावेत. अकरावी प्रवेशात त्यांच्यासाठी स्वतंत्र तुकडी करण्यात यावी तसंच तिन्ही शाखांच्या जागांमध्ये वाढ करावी,' अशी मागणी केली होती. 

'इथं' जागा वाढवल्या

नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी विधासभेच्या सभागृहात निवेदन केलं. त्यानुसार मुंबई, पुणे, नागपूर येथील ज्युनियर काॅलेजांसाठी त्यांनीवाढीव टक्केवारी जाहीर केली. मुंबईतील ज्युनिअर काॅलेजांमध्ये विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागावाढ होणार आहे. 

त्याचबरोबर पुणे आणि नागपूर येथील ज्युनिअर काॅलेजांमध्ये तिन्ही शाखांसाठी १० टक्के जागावाढ होईल. या जागावाढीमुळे राज्यातील एकही विद्यार्थी, विद्यार्थिनी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या काॅलेजांमध्ये प्रवेश घेता येणं सोपं झालं आहे.हेही वाचा-

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची कटऑफ नव्वदीपार

बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या - कपिल पाटीलRead this story in हिंदी
संबंधित विषय