Advertisement

दहावी, बारावीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेलं हे वेळापत्रक संभाव्य वेळापत्रक आहे. या वेळापत्रकाबद्दल कोणलाही काही शंका, हरकत किंवा सूचना असल्यास १५ दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळ किंवा राज्य मंडळाकडे लेखी स्वरूपात हरकत नोंदवावी, असं आवाहन मंडळानं केलं आहे.

दहावी, बारावीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केलं. यानुसार दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१९ या दरम्यान घेण्यात येणार असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ दरम्यान होणार आहे. अशी माहिती मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.


'या' वेबसाईटवर वेळापत्रक

विद्यार्थ्यांना परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. दरम्यान वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेलं वेळापत्रक हे संभाव्य वेळापत्रक आहे. परीक्षेपूर्वी सर्व शाळा व कॉलेजांकडे अंतिम वेळापत्रक पाठवण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खातरजमा करून घ्यावी, असं आवाहन मंडळानं केलं आहे. तसंच सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जाहीर झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असंही आवाहन मंडळानं केलं आहे.


९ विभागीय मंडळांतर्गत परीक्षा

दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावी व बारावीची परीक्षा देत असतात. त्यामुळं या परीक्षेच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलेलं असत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत या परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा, तोंडी व अन्य परीक्षांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळांना कळवण्यात येणार आहे.


संभाव्य वेळापत्रक

मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेलं हे वेळापत्रक संभाव्य वेळापत्रक आहे. या वेळापत्रकाबद्दल कोणलाही काही शंका, हरकत किंवा सूचना असल्यास १५ दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळ किंवा राज्य मंडळाकडे लेखी स्वरूपात हरकत नोंदवावी, असं आवाहन मंडळानं केलं आहे.


३ महिने विलंब

विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता यावे, यासाठी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंडळाच्या परीक्षांची संभाव्य तारीख जाहीर करण्याचा निर्णय मंडळाने काही वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, या तारखा विलंबानेच जाहीर केल्या जात आहेत. यंदाही शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.


किती दिवस हाती?

सोमवारी जाहीर झालेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी १३८ दिवस विद्यार्थ्यांच्या हाती आहेत. तर दहावीच्या परीक्षेसाठी १४६ दिवसांचा कालावधी विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे.हेही वाचा-

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात

विद्यापीठांच्या विविध परीक्षांना आजपासून सुरुवातRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा