Advertisement

अल्पसंख्यांक हक्क दिवस फक्त औपचारीकताच?


अल्पसंख्यांक हक्क दिवस फक्त औपचारीकताच?
SHARES

अल्पसंख्यांक हक्क दिवस शाळांमध्ये साजरा करणं ही केवळ औपचारिकता ठरणार आहे. कारण शाळा आणि कॉलेजांना याबाबतच्या सूचना केवळ २ दिवस आधी पाठवण्यात आल्याने आता आयत्या वेळी कसा कार्यक्रम घ्यायचा? असा प्रश्न शाळा, काॅलेज व्यवस्थापनापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे औपचारीकपणे हा दिवस साजरा केल्याचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा होईल, हे सांगणं कठीणच आहे.


शिक्षकांमध्ये नाराजी

शाळांमध्ये सध्या वार्षिक समारंभ, स्पोर्ट्स डे अशा कार्यक्रमांची तयारी सुरु आहे. अशात एक दिवसापूर्वी परिपत्रकाद्वारे शाळांना अपंग हक्क दिवस साजरा करण्यास सांगितल्याने शाळा व्यवस्थापनांना त्यासाठी काय आणि कशी तयारी करावी हा प्रश्न पडला आहे.



शाळेच्या उपक्रमांसाठी प्रत्येक शाळेचं स्वतःचं नियोजन असतं. शाळेत एखादा दिवस साजरा करताना संबंधित दिवसाचं महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. त्याप्रमाणे शाळा व शिक्षकांना नियोजन करावं लागतं. त्याचा आवश्यक अहवालही सादर करावा लागतो. शासनाकडून ऐनवेळी सूचना प्राप्त झाल्यावर नियोजन नेमकं कसं करावं असा प्रश्न पडल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.


शाळांना अचानक अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्याचे आदेश आल्याने शाळांना उपक्रमांचं नियोजन करणं अवघड झालं आहे. शिक्षण विभागाने जून मधेच सर्व विभागांशी चर्चा करून एक वार्षिक कॅलेंडर तयार करावं म्हणजे शाळांना दिवस साजरे करताना व्यवस्थित नियोजन करता येईल. याबाबत अनेकदा शिक्षण विभागाकडे मागणी करूनसुद्धा दुर्लक्ष करण्यात येत आहे. पुढील शैक्षणिक वर्षात तरी वर्षभराच्या शैक्षणिक उवक्रमाचं कॅलेंडर तयार करावं.

- अनिल बोरनारे, शिक्षक परिषद, मुंबई

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा