Advertisement

मीलन, कामातुर, कौमार्यभंग, पाचवीच्या मुलांना अर्थ काय सांगणार?

शिक्षण विभागाने अवांतर वाचनासाठी खरेदी केलेल्या पुस्तकातील मजकूरच आक्षेपार्ह असल्याचं समोर आलं आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चक्क ‘इंद्रियसुखा’चे धडे या अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकात दिले आहेत. त्यामुळे शिक्षक व पालकवर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

मीलन, कामातुर, कौमार्यभंग, पाचवीच्या मुलांना अर्थ काय सांगणार?
SHARES

शिक्षण विभाग आता शैक्षणिक ज्ञान देणारा विभाग न राहता शायनिंग विभाग झाल्याची टीका राज्याच्या शिक्षण विभागावर होत असताना शिक्षण विभागाचा आणखी एक पराक्रम उघडकीस आला आहे. अवांतर वाचनासाठी खरेदी केलेल्या पुस्तकातील मजकूरच आक्षेपार्ह असल्याचं समोर आलं आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चक्क ‘इंद्रियसुखा’चे धडे या अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकात दिले आहेत. त्यामुळे शिक्षक व पालकवर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.


अर्थबोधही होईल का?

‘बाल नचिकेत’ नावाच्या या पुस्तकात ‘मीलन, कामातुर आणि कौमार्यभंग’ अशा शब्दांचा वापर आहे. पाहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना या शब्दांचा अर्थबोधही होत नसताना अशा मजकुराच्या पुस्तकांची त्यांना आवश्यकता आहे का? असा प्रश्न पालक व शिक्षकांकडून उपस्थित होत आहे.



निवड तज्ज्ञ समितीकडून

या संदर्भात बालभारतीचे संचालक सुनील मगर यांना संपर्क केला असता पुस्तकांची निवड ही तज्ज्ञ समितीकडून करण्यात आली असल्याचं सांगत मजकूर पाहिल्याशिवाय प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.



२० रुपयांचं पुस्तक ५० रुपयांना

अवांतर वाचनातून विद्यार्थ्यांची प्रगती व विकास व्हावा हा हेतू असताना ही योजना आधी मोदींच्या पुस्तकामुळे आणि आता या आक्षेपार्ह मजकुरामुळे वादात आली आहे. विशेष म्हणजे ‘भारती विचार संस्थे’कडून २० रुपयांना मिळालेले हे पुस्तक विद्यार्थ्यांना ५० रुपये घेऊन माथी मारण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघड केलं आहे.


मुलांच्या ‘सोशलायझेशन’च्या नावाखाली १ हजार ३१४ शाळा बंद करणाऱ्या संवेदनशील शिक्षणमंत्र्यांना विद्यार्थ्यांची मानसिकता व आकलनाबाबतची एवढी साधी बाब लक्षात येऊ नये, हे आश्चर्यकारक आहे. आकलनाचा खरा दोष मुलांमध्ये नसून, शिक्षणमंत्र्यांमध्येच आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेता, विधानसभा


लहान मुलांच्या वाचनात अशी पुस्तकं आली, तर त्यांच्यासमोर यातील अश्लील शब्दांबाबत प्रश्न निर्माण होणार आहेत. या मुलांनी या शब्दांच्या अर्थाचं स्पष्टीकरण मागितलं, तर त्यांना काय उत्तर देणार? हा प्रश्न नक्कीच शिक्षकांसमोर उभा राहणार आहे. त्यामुळे ज्या कमिटीने पुस्तकं मंजूर केली त्यांनी ती स्वतः वाचली की नाहीत हा संशोधनाचा विषय आहे.
- प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना



हेही वाचा-

महापुरूषांच्याही वरचढ 'मोदी भक्ती'चं बजेट, पुस्तक खरेदीसाठी ६० लाखांचा खर्च



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा