Advertisement

‘स्थलांतरीत मुलांच्या शिक्षण, आरोग्य सेवांसाठी ट्रॅकिंग सिस्टिम’


‘स्थलांतरीत मुलांच्या शिक्षण, आरोग्य सेवांसाठी ट्रॅकिंग सिस्टिम’
SHARES

स्थलांतरित मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम उभारण्याचा प्रस्ताव शासन करत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी स्पष्ट केले आहे. स्थलांतरित होऊन रोजगारासाठी ज्या ठिकाणी ही मुले जातील तिथपर्यंत ट्रॅकिंग उभारणार असल्याचे मल्लिक यांनी सांगितले.

हवामानात होणारे बदल हे आव्हान आहे. पर्यावरणीय बदलांमुळेदेखील रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. स्थलांतराचा सर्वाधिक फटका समाजातील गोरगरिबांना बसतो. त्यामुळे या घटकाच्या सर्वसमावेशक विकासावर भर देणे आवश्यक आहे. तशा पद्धतीचे प्रयत्न महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येत आहेत.

- सुमित मल्लिक, मुख्य सचिव, महाराष्ट्र


बांधकाम व्यवसायात अनेक स्थलांतरित मुले काम करताना आढळून येतात. या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी उपकराच्या माध्यमातून निधी उभारण्यात येत आहे. त्यांना शिक्षण तसेच आरोग्याच्या सेवा देणेही आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. या योजनांचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याचबरोबर स्थलांतर ज्या ठिकाणी होत आहे, तो प्रदेश आणि जिथून हे स्थलांतर होत आहे, अशा दोन्ही प्रदेशांदरम्यान संवाद निर्माण होणे आवश्यक आहे, असेही मल्लिक यांनी यावेळी सांगितले.

युनिसेफ आणि महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्थलांतर आणि मुले-कृतीपासून धोरणापर्यंत’ या एकदिवसीय आंतरराज्यीय चर्चासत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.


हेही वाचा - 

टॅलेंट हंटच्या नावाने चालणाऱ्या परीक्षा यापुढे बंद, शिक्षण उपसंचालकांचा आदेश


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा