रुईयात मराठी भाषा गौरव दिनाची तयारी

 Matunga
रुईयात मराठी भाषा गौरव दिनाची तयारी
रुईयात मराठी भाषा गौरव दिनाची तयारी
See all

माटुंगा - यंदाही रुईया महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्त रामनारायण रुईया महाविद्यालय मराठी विभाग आणि जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभाग यांच्यावतीने 'साज मराठी'चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये मराठी पोवाडे, मराठी गौरव गीते, आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही विद्यार्थी आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांना सोमवारी 27 फेब्रुवारी 2017 ला सकाळी 11 वाजता साज मराठी या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, रुईया महाविद्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या सभागृहात पार पडेल.

Loading Comments