Advertisement

एमसीएची सीईटी पुढे ढकलली, 28 मार्चऐवजी होणार 'या' तारखेला

आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा यंत्रणेतर्फे घेण्यात येणारी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा 28 मार्चला होणार होती.

एमसीएची सीईटी पुढे ढकलली, 28 मार्चऐवजी होणार 'या' तारखेला
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने सर्व शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे. तसंच सर्व परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहे. आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा यंत्रणेतर्फे घेण्यात येणारी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा 28 मार्चला होणार होती. ही परीक्षा आता ३० एप्रिल २०२० रोजी होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी पुढे ढकलून 30 एप्रिलला होणार असल्याची माहिती दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सर्वच परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सीईटीसाठी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. एप्रिलमध्ये होणाऱ्या सीईटीबाबत ३१ मार्चनंतर राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असं सामंत यांनी सांगितले.

अनेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिल्यानंतरही परीक्षा वेळापत्रकाप्रमाणंच घेण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, परीक्षांच्या दरम्यान केंद्रांबाहेर होणारी गर्दी, विद्यार्थी आणि पालकांमधील ताण लक्षात घेऊन आता ३१ मार्चपर्यंत सीबीएसई आणि एनआयओएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं (Ministry of Manpower Development) घेतला आहे.

केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसईच्या दहावीच्या बहुतेक महत्वाच्या विषयांची परीक्षा झाली आहे. बारावीच्या वेळापत्रकावर मात्र या निर्णयाचा परिणाम होणार आहे. बारावीच्या वाणिज्य शाखेच्या २ आणि कला शाखेच्या ३ विषयांची परीक्षा आता एप्रिलमध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षांच्या मूल्यांकनाचे कामही ३१ मार्चपर्यंत थांबवण्यात येणार आहे.



हेही वाचा -

Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधीतांची हाफ सेंच्युरी, ३ नवे रुग्ण आढळले

Coronavirus Updates: शासकीय कार्यालयांसह शाळा-कॉलेजांमध्येही ५० टक्के उपस्थिती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा