Advertisement

मेडीकल इंटर्न्स १३ जूनपासून संपावर


मेडीकल इंटर्न्स १३ जूनपासून संपावर
SHARES

सुरक्षेच्या प्रश्नावरुन नुकतंच राज्यातील डाॅक्टरांनी संप पुकारला होता. त्यापाठोपाठ आता राज्यातील मेडीकल इंटर्न्ससुद्धा १३ जूनपासून संपावर जाणार आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मेडीकल इंटर्न्सना कमी वेतन मिळतं. सरकारने हे वेतन वाढवावं या मागणीसाठी संप केला जाणार अाहे.


संपाचं नेमकं कारण काय ?

वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांना किमान एक सेमिस्टर इंटर्नशीप करावी लागते. इंटर्नशीपमध्ये विद्यार्थ्यांना ११ हजार रुपये वेतन दिलं जातं. इतर राज्यात इंटर्नशीपसाठी ११ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन दिलं जातं. इतर राज्याच्या तुलनेत आपल्याला खूपच कमी वेतन दिलं जात असल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं अाहे.


प्रशासनाचं दुर्लक्ष

वेतनवाढीसाठी या आधीदेखील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयानं २६ एप्रिल रोजी निदर्शनं केली होती त्यानंतरही सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाहीत. त्यामुळं जर १२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांचं वेतन वाढलं नाही तर १३ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.हेही वाचा - 

एफवाय प्रवेशपूर्व ऑनलाईन प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल

'लॉ'च्या विद्यार्थ्यांना लोंडशेडिंगचा फटकाRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा