Advertisement

पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना आता 'नो होमवर्क'!

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने राज्यांना परिपत्रक पाठवून पहिली अाणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ ने देण्याचे अाणि दप्तराचे वजन जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत असण्याचे निर्देश दिले अाहेत.

पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना आता 'नो होमवर्क'!
SHARES

पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांची अाता गृहपाठापासून सुटका होणार अाहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक परिपत्रक काढून पहिली अाणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ न देण्याचे निर्देश दिले अाहेत. याशिवाय १० वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझेही कमी होणार अाहे. 


गणित, भाषा विषयच

 मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने राज्यांना परिपत्रक पाठवून पहिली अाणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ ने देण्याचे अाणि दप्तराचे वजन जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत असण्याचे निर्देश दिले अाहेत. पहिली अाणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि भाषा हे दोनच विषय शिकवण्याच्या अाणि तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित, भाषा आणि सामान्य विज्ञान शिकवण्याच्या सूचनाही या परिपत्रकात देण्यात अाल्या अाहेत. याशिवाय अावश्यकता नसणारी पुस्तकं शाळेत न आणण्याबाबतचा निर्णय शाळांनी घ्यावी, अशीही सूचना करण्यात अाली अाहे. 


दप्तराचं वजन घटलं

तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन दोन ते तीन किलो, सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन चार किलो, आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार किलो आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन पाच किलोपेक्षा अधिक असू नये अशा सूचनाही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिल्या अाहेत. हेही वाचा - 

लॉचे विद्यार्थी गोंधळात, पदवी देण्यात विद्यापीठाचा घोळ

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीद्वारे नवीन सराव प्रश्नसंचRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा