Advertisement

लॉचे विद्यार्थी गोंधळात, पदवी देण्यात विद्यापीठाचा घोळ


लॉचे विद्यार्थी गोंधळात, पदवी देण्यात विद्यापीठाचा घोळ
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई विद्यापीठमध्ये लॉच्या परीक्षा वेळापत्रक आणि निकाल गोंधळ यांसारखे विविध गोंधळ समोर येत असताना नुकतंच मुंबई विद्यापीठाच्या लॉ विधी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सेमिस्टरची गुणपत्रिका कॉलेजकडून आणि पदवी विद्यापीठाकडून मिळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत स्टुडंट लॉ कौन्सिलनं विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.


नेमकं प्रकरण काय?

लॉ अभ्यासक्रमाच्या ३ वर्षानंतर बॅचलर ऑफ लीगल सायन्स ही पदवी मिळते. मात्र या पदवीच्या ५ व्या सेमिस्टरला विद्यापीठाची गुणपत्रिका तर सहाव्या म्हणजे शेवटच्या सेमिस्टरला कॉलेजची गुणपत्रिका देण्यात येत आहे.

३ वर्षाच्या लॉ अभ्यासक्रमात दुसर्‍या वर्षी बॅचलर ऑफ जनरल लॉ ही पदवी देण्यात येत असून यामध्ये विद्यापीठ तिसर्‍या सेमिस्टरला विद्यापीठाकडून मार्कशीट देण्यात येते. तर चौथ्या सेमिस्टरला कॉलेजकडून गुणपत्रिका दिली जात आहे.

या अभ्यासक्रमात तिसर्‍या वर्षाला बॅचलर ऑफ लॉ ही पदवी मिळत असून त्यात सुद्धा शेवटच्या सेमिस्टरची गुणपत्रिका महाविद्यालयाकडून मिळत असल्याची तक्रार मुंबई स्टुडंट लॉ कॉउन्सिलनं केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाचा ६०/४० परीक्षा पॅटर्नच्या वादाला न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर पूर्णविराम मिळाला होता. त्यानंतर आता पदवीचा वाद समोर आला आहे.

विधी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा विद्यापीठाचा ताण कमी व्हावा यासाठी पदवीचे शेवटचं वर्ष सोडून इतर वर्षाचे निकाल हे कॉलेजनी गुणपत्रिका देऊन जाहीर करण्याचं ठरवलं. यामुळे विद्यापीठाच्या पदवीचा आणखीच गोंधळ वाढला आहे. सेमिस्टर ५ आणि ३ हे वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सेमिस्टरला विद्यापीठातून देण्यात येणारी गुणपत्रिका कॉलेज देत असल्यानं अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत. यामुळे ही पदवी कितपत ग्राह्य धरली जाईल, अशी शंका आता निर्माण झाली आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी विद्यपीठाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडन्ट लॉ कौन्सिल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा