Advertisement

कपिल पाटील यांना शिक्षणमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी काळा कंदील लावत घोषणाबाजी केली. पाटील यांच्या कृत्याचा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खरपूस समाचार घेतलाय.

कपिल पाटील यांना शिक्षणमंत्र्यांचे सडेतोड उत्तर
SHARES

शिक्षकांची यंदाची दिवाळी आनंदी व प्रकाशमान झाली आहे. आ. पाटील यांना स्वार्थापोटी शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसत आहे, अशा शब्दांत तावडे यांनी पाटील यांच्या कृत्याचा खरपूस समाचार घेतला. रात्र शाळा, शिक्षकांचं वेतन अशा अनेक विषयांवर सरकारला दोषी ठरवत मंगळवारी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी काळा कंदील लावण्याचा प्रयत्न केला होता.  

शिक्षकांना युनियन बँकेऐवजी मुंबई बँकेतून पगार देण्यात येतो. गणपती आणि दिवाळीत शिक्षकांचा पगार मुंबई बँकेत वेळेत जमा झाला. ज्या शिक्षकांनी मुंबई बँकेत आपलं खातं उघडलं त्या शिक्षकांचा पगार सणांच्या आधी झाला. असं असतानाही केवळ लागेबांधे असल्यामुळे एका विशिष्ट बँकेत शिक्षकांचा पगार जमा करण्याचा अट्टाहास ते करत आहेत, असा टोलाही तावडे यांनी लगावला. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांच्या हाती प्रचारासाठी काहीच नाही. त्यामुळे काळे कंदील लावणे, स्वत:ला अटक करुन घेणे ही शोबाजी करुन ते शिक्षकांना भुलवत असल्याचा आरोपही तावडे यांनी केला.


कपील पाटील यांच्या मागण्या:

  1. रात्र शाळा आणि पूर्ण वेळ शाळा दोन्ही ठिकाणी नोकरी करणाऱ्या शिक्षकांना कायम ठेवा
  2. अर्धवेळ नोकरी करणाऱ्या शिक्षकांना काढून टाका
  3. शिक्षकांचे पगार मुंबई बॅँकेतून न करता युनियन बॅँकेतूनच करा 
  4. ऑनलाईन माहिती भरण्यासाठी शिक्षकांना जुंपू नका


अशा अनेक मागण्या घेऊन कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या निवासस्थानी काळा कंदील लावत घोषणाबाजी केली.



हेही वाचा -

शिक्षकांनो, मुंबै बँकेत खाते उघडले नाही, तर पगार नाही!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा