Advertisement

शिक्षकांनो, मुंबै बँकेत खाते उघडले नाही, तर पगार नाही!


शिक्षकांनो, मुंबै बँकेत खाते उघडले नाही, तर पगार नाही!
SHARES

ज्या शिक्षकांनी अजूनपर्यंत मुंबै बॅँकेत खाते उघडले नाही, अशा शिक्षकांचे पगार रखडणार आहेत. कारण मुंबईतील खासगी अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षेकतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबै बॅँकेमार्फत करण्याचा निर्णय 3 जूनला शालेय शिक्षण विभागाने घेतला.

ज्यांनी मुंबै बॅंकेत खाते उघडले आहे, अशा शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेलाच बॅँकेत जमा होणार आहे. शासनाकडून जरी पे-स्लीप वेळेवर मिळाली नाही, तरी बॅँकेकडून एक तारखेलाच शिक्षकांना पगार देण्यात येतील.

शिक्षकांचे वेतन कोणत्या बॅँकेतून होणार यासंदर्भात काही शिक्षक संघटना चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवत आहेत. त्यामुळे शिक्षकांची दिशाभूल केली जात आहे. मुंबै बॅँकेत खाते उघडलेल्या शिक्षकांचे पगार हे एक तारखेलाच होणार आहेत. उर्वरीत शिक्षकांनी लवकरात लवकर मुंबै बॅँकेत खाते उघडावे. कोणाच्याही दबावाला बळी पडू नये.

विनोद तावडे, शिक्षणमंत्री


शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध

शिक्षण विभागाच्या या निर्णयाला शिक्षकांच्या संघटनांनी विरोध केला आहे. तरीही एकूण 956 शाळांपैकी 714 मुख्याध्यापकांनी, 19,669 शिक्षकांनी मुंबै बॅँकेत खाते उघडले आहे. उर्वरीत 204 मुख्याध्यापक आणि 2111 शिक्षकांना उच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत पगार उशिरा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी मुंबईतील बहुतांश शाळांमधल्या शिक्षकांचे पगार मुंबै बॅँकेतच जमा होत होते. आमदार कपिल पाटील यांच्या संघटनेच्या पुढाकाराने नंतर ते युनियन बॅँकेतून होऊ लागले. मात्र शिक्षकांना बॅँकेकडून देण्यात आलेल्या एटीएम कार्डवर शिक्षक भारती संघटनेचे नाव आणि लोगो होता. यावर अनेकांनी अक्षेपही घेतला होता.



हेही वाचा - 

शिक्षकांचे पगार मुंबई जिल्हा बँकेतच का?

शिक्षकांनो, आता विनाकारण शाळेत थांबणे बंद!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा