शिक्षकांचे पगार मुंबई जिल्हा बँकेतच का?


  • शिक्षकांचे पगार मुंबई जिल्हा बँकेतच का?
SHARE

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आक्रमक झाले आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत होणारे पगार थांबवून मुंबै बँकेत खाती उघडण्यासाठी होणारी सक्ती थांबवावी, यासाठी प्रकाश सुर्वे सोमवरी विधानभवनासमोर लाक्षणिक उपोषण केले.


पगार मुंबै बँकेतच का?

नाशिक जिल्हा, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून होणारे शिक्षकांचे पगार थांबवून आयडीबीआय, ठाणे जनता बँक आणि नॅशनल बँकेत सुरू केले. पण मुबईत नॅशनल बँकांमध्ये होणारे शिक्षकांचे पगार बंद करून ते मुंबै जिल्हा बँकेत सुरू करण्याचा घाट का घातला जात आहे? असा प्रश्न सुर्वे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यानंतर आता सुर्वे यांच्या उपोषणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे.


मुंबै जिल्हा बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यातच या बँकेच्या शाखा मुंबईतील सर्व विभागात नाहीत. या बँकेची फक्त 23 एटीएम आहेत. त्यामुळे शिक्षकांचा याला विरोध आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार या बँकेत देण्याचा घाट का?

प्रकाश सुर्वे, आमदार, शिवसेना


ज्या शिक्षकांनी मुंबै बँकेत खाती उघडली आहेत, त्यांचे पगार झाले आहेत. प्रकाश सुर्वे आणि प्रवीण दरेकर यांचे वैयक्तिक भांडण आहे. विधानसभेच्या निवडणुका 2019 मध्ये होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर असे प्रकार होत आहेत. शिक्षकांनी अपप्रचाराला बळी पडू नये. मुंबै बँकेला आरबीआयने क्लिन चिट दिली आहे. या बँकेद्वारे शिक्षकांचे पगार वेळेत होतील.

विनोद तावडे, शिक्षण मंत्री



हेही वाचा -

मुंबै बँकेने कुणालाही नियमबाह्य कर्ज दिलेले नाही - दरेकर

मुंबई बँकेला रोकड स्वीकारण्यास बंदी


संबंधित विषय
ताज्या बातम्या