चार महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक पगाराविना

 Charni Road
चार महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक पगाराविना
चार महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक पगाराविना
चार महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक पगाराविना
See all
Charni Road, Mumbai  -  

मुंबई - गेल्या चार महिन्यांपासून पगारच नसल्याने अतिरिक्त शिक्षक आणि प्लॅनमधील शिक्षक यांनी सोमवारी चर्नीरोड येथील शिक्षण उपंसचालक कार्यालयावर शिक्षक भारतीच्या नेतृत्वाखाली धडक आंदोलन केले.

शिक्षकांचे आक्षेप

  1. अतिरिक्त ठरलेले शिक्षक आणि प्लॅनमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार मागील चार महिन्यांपासून झालेले नाहीत.
  2. ज्युनिअर कॉलेजच्या सहाय्यक शिक्षण सेवक यांना सेवा सातत्य दिले गेलेले नाही. 
  3. वैयक्तिक मान्यतेचे शिबीर गेल्या चार वर्षांपासून लावलेले नाही.
  4. अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसतानाही सक्ती केली जात आहे.

याविरोधात शिक्षक भारतीने चर्नीरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक आंदोलन केले.यावेळी सहाय्यक शिक्षण उपसंचालक यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारुन शिक्षण उपसंचालक यांना कल्पना दिली. पुणे येथे आयुक्त कार्यालयात मिटींगमध्ये असणाऱ्या शिक्षण उपसंचालकांनी आयुक्तांशी बोलून पगार त्वरित सुरु करण्याबाबत तसेच ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचे शिबीर लावण्याबाबतचे आश्वासन दिले.

वारंवार आश्वासन देऊनही या शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवणे बेकायदेशीर आहे, असे शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह सुभाष मोरे यांनी सांगितले. यावेळी जालिंदर सरोदे, शशिकांत उतेकर, आर. बी. पाटील, सुरेश कोकितकर, शिवाजी खैरमोडे, प्रकाश शेळके, शरद गिरमकर, वसंत पाटील, प्रमोद बुगड यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

Loading Comments