शिक्षकांनो, आता विनाकारण शाळेत थांबणे बंद!

  Mumbai
  शिक्षकांनो, आता विनाकारण शाळेत थांबणे बंद!
  मुंबई  -  

  काही शाळांमध्ये व्यवस्थापनाकडून शिक्षकांना विनाकारण उशीरापर्यंत थांबवून त्यांना त्रास देण्याचे प्रकार समोर आले आहेत. शिक्षकांना होणारा हा जाच थांबविण्यासाठी शाळा सुटल्यावर शिक्षकांना विनाकारण शाळेत थांबवू नका, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

  त्यामुळे शिक्षकांना विनाकारण थाबवून त्रास देण्याचे प्रकार या निर्णयाने थांबणार आहेत. याबाबत शिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती.


  शिक्षणहक्क कायद्याचा भंग

  अनिल बोरनारे यांनी 19 जून 2017 रोजी 'राईट टू एज्युकेशन' अंतर्गत शिक्षकांच्या हक्कांचा उल्लेख तक्रार करताना केला होता. शिक्षकांना विनाकारण थांबवून ठेवणाऱ्या शाळा शिक्षण हक्क कायद्याचा भंग करत असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या पत्राची उपसंचालकांनी दखल घेत शिक्षण निरीक्षकांना याबाबत निर्देश दिले आहेत.


  सकाळच्या सत्रातील शाळा 7 ते 12.30, तर दुपारच्या सत्रातील शाळा 12.30 ते 6 वाजेपर्यंत भरतात. परंतु सकाळची शाळा सुटल्यानंतरही अनेक शाळा शिक्षकांना दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवून ठेवतात. तर दुपारी शाळा सुरू होण्याच्या आधी शिक्षकांना बोलावले जाते किंवा उशीरापर्यंत थांबविले जाते. त्याचा शिक्षकांना नाहक त्रास होत होता. शिक्षण हक्क कायद्यात शिक्षकांच्या कार्यभाराबाबत स्पष्ट निर्देश दिलेले असूनसुद्धा अनेक शाळा या कायद्याचा भंग करीत आहेत. यापुढे मात्र शाळांना या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.


  - अनिल बोरनारे, अध्यक्ष, शिक्षक परिषद
  हेही वाचा

  मुलांचं झालेलं नुकसान शाळा भरून देणार का?

  गरीब विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणाचा हक्क


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.