मुलांचं झालेलं नुकसान शाळा भरून देणार का?

Mumbai  -  

माटुंगा - आयईएस शाळेतल्या या मुलांच्या तब्बल पाच महिन्यांच्या शिक्षणाचं शाळेनं नुकसान केलंय. आर्थिक अडचणींमुळे केवळ फी भरता आली नाही म्हणून या मुलांना गेल्या पाच महिन्यांपासून शाळेत बसूच दिलं गेलेलं नाही. त्यामुळे शिक्षण हक्क कायदा आहे तरी कुठे? असाच प्रश्न आता निर्माण झालाय. या मुलांच्या फीची रक्कम होती तब्बल दोन लाख वीस हजार रूपये. त्यातली ४० हजार रक्कम पालकांनी भरलीही. मात्र उरलेली रक्कम भरण्यासाठी मागितलेली मुदत देण्यास शाळेनं थेट नकार दिला. याबाबत पालकांनी पोलिसातही तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर मुलांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. १० एप्रिलपर्यंत उर्वरीत १ लाख ८० हजार एवढी रक्कम भरण्याची मुभा शाळेकडून देण्यात आली आहे. मात्र शाळेच्या या मनमानीमुळे या मुलांचं पाच महिन्यांचं नुकसान झालं आहे. ते कसं भरून काढणार? या प्रश्नावर मात्र शाळा प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही.

Loading Comments