Advertisement

व्हिजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांना हटवा, मनविसेचं राज्यपालांना निवेदन


व्हिजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांना हटवा, मनविसेचं राज्यपालांना निवेदन
SHARES

महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांच्या मुख्य पदांवर भूमिपुत्रांना डावलून परप्रातीयांना संधी दिली जाते, अशा नियुक्त्या तात्काळ रद्द करून त्या पदावरील अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनविसेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन देऊन केली आहे.

व्हीजेटीआयमध्ये धीरेन पटेल यांची संचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही शिक्षणसंस्था राज्य सरकारच्या अखत्यारीत असून पात्र उमेदवार असतानाही मराठी भाषा येत नसलेल्या अमराठी आणि पात्रता नसलेल्या अधिकाऱ्याची निवड व्हीजेटीआयच्या संचालकपदी करण्यात आली ही शरमेची बाब असल्याचं मनविसेचे शिष्टमंडळाने ही निवड रद्द करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी राज्यपालांकडे केली.


उच्च शिक्षणाचा पाया भक्कम करा

याचसोबत रुसा या केंद्र शासनाच्या शैक्षणिक योजनेत मागील ३ वर्षांत महाराष्ट्राला आपलं प्रतिनिधीत्व करता आलं नाही. यासाठी राज्यपालांनी एका विशिष्ट समिती गठीत करावी आणि हायर एज्युकेशनचा पाया भक्कम करावा, अशी मागणीही या शिष्टमंडळाने यावेळी केली. सोबतच मुंबईसह राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि शासन वसतिगृहे यांचं ताबडतोब फायर ऑडिट करावं, अशी मागणीही केली आहे.


निधी इतर कामांसाठी खर्च

शासनामार्फत समाज कल्याण विभागाला जो निधी प्राप्त होतो तो विद्यार्थ्यांना न मिळता शासनाच्या इतर विभागांसाठी खर्च केला जातो, असा दावा शिस्टमंडळाने केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निधी त्यांना योग्य त्या वेळेत मिळावा यासाठी तरतूद करावी आणि ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्याने त्यात पारदर्शकता आणावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.


अजूनही कारवाई नाही

मुंबई विद्यापीठाच्या घोळाबाबत सखोल चौकशी करून दोशींवर कारवाई करावी. सोबतच मुंबई विद्यापीठाच्या घोळाबाबत माहिती देताना आधीच्या कुलगुरूंना बडतर्फ केलं तरी ज्यांच्यामुळे उत्तरपत्रिका गहाळ झाल्या त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर करावी करावं, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा