Advertisement

MPSC: राज्य सेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्चला

गुरूवारी १४ मार्च रोजी होणारी परीक्षा कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली होती. त्यामुळे पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

MPSC: राज्य सेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्चला
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी घेतली जाणार आहे. 

गुरूवारी १४ मार्च रोजी होणारी परीक्षा कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली होती. त्यामुळे पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली. यानंतर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीने प्रसिद्धीपत्रक काढून  २१ मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार असल्याची माहिती दिली. 

तसंच २७ मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तसंच ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, नवीन तारखेवर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्व परीक्षा २१ मार्चला होणार आहे. मात्र, त्या दिवशी इतरही परीक्षा आहेत. त्या दिवशी विमानतळाच्या परीक्षा आहेत. पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतात. इतर परीक्षा त्या दिवशी असताना त्याच दिवशी उमेदवार एमपीएससीची परीक्षा कशी काय देणार? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा