Advertisement

प्रतीक्षा संपली! आज लागणार दहावीचा आॅनलाइन निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार दहावीचा निकाल ८ जून २०१९ रोजी दुपारी १ वाजता लागणार आहे.

प्रतीक्षा संपली! आज लागणार दहावीचा आॅनलाइन निकाल
SHARES

दहावीचा (SSC 10th Result 2019) निकाल आज लागणार की उद्या लागणार? व्हाॅट्सअॅपवरील तारीख खरी की खोटी? यावरून गोंधळात पडलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (MSBSHSE)ने अखेर शुक्रवारी दिलासा दिला. मंडळाने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार दहावीचा निकाल ८ जून २०१९ रोजी दुपारी १ वाजता लागणार आहे. मंडळाच्या या घोषणेमुळे दहावीच्या परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.  

बोर्डाकडून खुलासा

बारावीच्या निकालानंतर ७ जून रोजी दहावीचा निकाल लागणार अशा अफवा व्हाॅट्सअॅप, फेसबुक अशा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांत फिरत होत्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागत असल्याने विद्यार्थी तसंच पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यावर खुलासा करताना या बातम्या चुकीच्या असून त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं मंडळाने गुरूवारी स्पष्ट केलं होतं.  

‘इथं’ बघा निकाल

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर अशा ९ विभागीय मंडळांतर्फे १ मार्च ते २२ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना maharashtraeducation.com , mahresult.nic.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in. या संकेतस्थळांवर पाहता येईल.

 

 


हेही वाचा-

७ जूनला दहावीचा निकाल ही अफवा, बोर्डाने केला खुलासा

NEET परीक्षेचा निकाल जाहीर; सार्थक भट राज्यात पहिला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा