कलिना - चला कोकणला आणि मुंबई विद्यापीठाचा पत्रकार विभाग 20 ऑक्टोबरला रत्नागिरी जिल्हातल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट देणार आहे. या अणुऊर्जा प्रकल्पाविषय माहिती मिळवण्यासाठी हा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आलाय. या प्रकल्पाद्वारे किती लोकांचा ऊर्जा प्रश्न सुटणार आहे? किती लोकांना रोजगार उपलब्ध होणार? या प्रकल्पाचा पर्यावरणावर काही परिणाम होणार का? या प्रकल्पामागे नेमके काय राजकारण आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 23 ऑक्टोबरपर्यंतच्या या अभ्यास दौऱ्यात हे भावी पत्रकार शोधतील.