SHARE

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेमार्फत बँकिंग क्षेत्रात विशेष अधिकारी पद (सीआरपी) यासाठी एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

इच्छुक उमेद्वारांना आयबीपीएसच्या www.ibps.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत यासाठी अर्ज करता येणार आहे. ही अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 27 नोव्हेंबर 2017 पर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना 2017 या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत प्राथमिक परीक्षा देता येणार आहे.


या जागांसाठी निघाली अधिसूचना

 • आयटी अधिकारी
 • कृषीक्षेत्र अधिकारी
 • राजभाषा अधिकारी
 • कायदा अधिकारी
 • मानव संसाधन/ कार्मिक अधिकारी
 • मार्केटिंग अधिकारी


या तारखेपासून होणार सुरुवात

 • अर्ज प्रक्रियेची सुरुआत - 7 नोव्हेंबर, 2017
 • अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख - 27 नोव्हेंबर, 2017
 • प्राथमिक ऑनलाइन परीक्षा - 30 डिसेंबर आणि 31, 2017
 • मुख्य ऑनलाइन परीक्षा - 28 जानेवारी, 2018


पात्रता

 • उमेदवाराचे वय किमान 20 वर्ष असावे
 • उमेदवाराचे वय 30 हून अधिक नसावे
 • उमेदवार हा संबंधित पदासाठी पात्र पदवीधर असावा
संबंधित विषय
ताज्या बातम्या