Advertisement

बीकॉमची परीक्षा कधीपासून सुरू होणार, जाणून घ्या


बीकॉमची परीक्षा कधीपासून सुरू होणार, जाणून घ्या
SHARES

तुम्ही जर बीकॉमचे विद्यार्थी असाल आणि तुमच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असेल तर जरा इकडे लक्ष द्या. कारण परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत


...या तारखेपासून होतील परीक्षा

बदललेल्या वेळापत्रकानुसार दिनांक ९, १३ आणि १५ नोव्हेंबरला घेण्यात येणारे पेपर १८, २५ आणि २८ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात येणार आहेत. ९, १३ आणि १५ नोव्हेंबरलाच सीएच्या परीक्षा होणार असल्यामुळे हजारो मुलांचे नुकसान झाले असते. त्यामुळे मुलांनी अखेर शिक्षणमंत्र्यांकडे धाव घेतली होती.


का केली बदल?

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बीकॉमच्या द्वितीय सत्राचे आणि बीकॉमच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. वाणीज्य शाखेच्या द्वितीय वर्षाच्या आणि सीए परीक्षा एकाचवेळेस आल्याने परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. परिक्षेच्या वेळापत्रकात बदल व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती. शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर बीकॉम परीक्षांमध्ये बदल करण्यात आले आहे.


ते वेळापत्रक खोटेच

बीकॉमच्या परीक्षेच्या तारखा बदलण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिल्यानंतर सोशलमिडीयावर बीकॉमचे वेळापत्रक फिरत होते. मात्र ते वेळापत्रक चुकीचे असल्याचे परिक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.



परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून या परीक्षांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या संबंधीचे परीपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व संबंधित प्राचार्यांनी ही बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
- डॉ. अर्जून घाटुळे, संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा