Advertisement

मुंबई विद्यापीठातील पदवी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

मुंबई विद्यापीठातील पदवी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार 5 ऑगस्टपासून ऑनलाईन प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. 

प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर  सुरू करण्यात येत आहे. हेल्पलाईन क्रमांक सुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.  विद्यार्थ्यांनी हमीपत्र फॉर्म भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

 वेळापत्रक

- ऑनलाईन अर्ज विक्री 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (दुपारी 1 वाजेपर्यंत)

- प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (दुपारी 1 वाजेपर्यंत)

- ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.

प्रवेशासाठी पहिली मेरिट लिस्ट 

- पहिली मेरीट लिस्ट 17 ऑगस्ट, 2021 ( सकाळी 11 वाजता)

- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 2021 (सायं. 3 वाजेपर्यंत )

दुसरी मेरिट लिस्ट 

- द्वितीय मेरीट लिस्ट 25 ऑगस्ट, 2021 ( सायंकाळी 7 वाजेपर्यंत)

- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2021 ( दुपारी 3 वाजेपर्यंत)

 तिसरी मेरिट लिस्ट

- तिसरी मेरिट लिस्ट 30 ऑगस्ट, 2021 ( सायंकाळी 7 वा.)

-ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर, 2021

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा