Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षा स्थगित

मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षा स्थगित
SHARES

अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुंबई विद्यापीठ, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आजपासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्कारच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठानं आजपासून सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगित परीक्षांचं लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठानं परीक्षा स्थगित केल्याचं परिपत्रक काढत माहिती दिली.

राज्यातील अकृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यार्थी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी  आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये परीक्षा वरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला आहे.

परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवारपासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दोन फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवार पासून स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल.



हेही वाचा

मुंबई युनिव्हर्सिटीचे डिस्टन्स अॅड ओपन लर्निंग कोर्सेससाठी प्रवेश सुरू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा