Mumbai Live IMPACT: विद्यापीठानं 'पेट' परीक्षा ढकलली पुढे

शनल एलिजिबिलीटी टेस्ट (नेट) आणि 'पेट' या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा एकत्र येत असल्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भातील वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने दिल्यानंतर विद्यापीठाने 'पेट' परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठाने यंदा प्रथमच पीएचडी/एमफील इंटरन्स टेस्ट (पेट) परीक्षा १६ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. मात्र नॅशनल एलिजिबिलीटी टेस्ट (नेट) आणि 'पेट' या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा एकत्र येत असल्याने विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भातील वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने दिल्यानंतर विद्यापीठाने 'पेट' परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६ डिसेंबरला होणारी 'पेट' परीक्षा आता २३ डिसेंबरला होणार आहे.


नेमकं प्रकरण काय?

कॉऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंड्रस्ट्रिअल रिसर्चमध्ये (सीएसआयआर) संशोधन करण्यासाठी 'नेट' प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात. परंतु 'सीएसआयआर'साठी संधी मिळण्याची खात्री नसल्याने बरेचसे विद्यार्थी विद्यापीठ स्तरावरील पीएचडीला प्रवेश मिळवण्यासाठी 'पेट' परीक्षा देतात. 'नेट' परीक्षा १६ डिसेंबर रोजी होणार असल्याचं वेळापत्रक काही महिन्यांपूर्वी 'सीएसआयआर' तर्फे जाहीर करण्यात आलं होतं. परंतु काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने 'पेट' परीक्षा १६ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने घेणार असल्याचं जाहीर केलं.


राज्यपालांना पत्र

परंतु याच दिवशी राष्ट्रीय पातळीवरील 'नेट' प्रवेश परीक्षा होणार असल्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थी चांगलेच पेचात अडकले होते. विशेष म्हणजे यावरून विद्यापीठाचा आणखी एक वेळापत्रक गोंधळ समोर आला होता. यासंदर्भात अनेक विद्यार्थी संघटनानी विद्यापीठ प्रशासन व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्र लिहलं होतं.


अर्ज कधीपर्यंत?

त्यानंतर मुंबई विद्यापीठाने पीएचडीची प्रवेश परीक्षा १६ डिसेंबरऐवजी २३ डिसेंबर रोजी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. या परीक्षेच हॉल तिकीट १५ डिसेंबर रोजी ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास ६ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली असून २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.हेही वाचा-

'पेट' आणि 'नेट' एकाच दिवशी; विद्यापीठाचा नवा गोंधळ

पीएचडी प्रवेश परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईनसंबंधित विषय
ताज्या बातम्या