Advertisement

'पेट' आणि 'नेट' एकाच दिवशी; विद्यापीठाचा नवा गोंधळ

'पेट' आणि 'नेट' या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकावरून पुन्हा एकदा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाचा वेळापत्रक गोंधळ समोर आला आहे.

'पेट' आणि 'नेट' एकाच दिवशी; विद्यापीठाचा नवा गोंधळ
SHARES

मुंबई विद्यापीठाने यंदा प्रथमच पीएचडी/एमफील इंटरन्स टेस्ट (पेट) परीक्षा १६ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. परंतु याच दिवशी राष्ट्रीय पातळीवर नॅशनल एलिजिबिलीटी टेस्ट (नेट) प्रवेश परीक्षा होणार असल्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थी चांगलेच पेचात अडकले आहेत. यामुळं विद्यापीठाचा वेळापत्रक गोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. परंतु या गोंधळामुळे विद्यार्थी मात्र चांगलेच संतापले आहेत.


७ हजार विद्यार्थी

कॉऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंड्रस्ट्रिअल रिसर्चमध्ये (सीएसआयआर) संशोधन करण्यासाठी 'नेट' प्रवेश परीक्षा देणं गरजेचं असतं. विज्ञान शाखेच्या गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भू आणि सागर विज्ञान या शाखांसाठी 'सीएसआयआर'मध्ये संशोधन करण्याची संधी मिळते. परंतु या सर्व विद्यार्थ्यांना या संस्थेची 'नेट' प्रवेश परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थी या परीक्षेस पात्र असून सुमारे ७ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत असून राज्यात पुणे आणि नागपूर अशा दोनच ठिकाणी या परीक्षेची केंद्रे असतात.


एकाच दिवशी परीक्षा

विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांची या संस्थांमध्ये संशोधन करण्याची इच्छा असल्याने सहाजिकच अनेक विद्यार्थ्यांचा त्याकडे ओढा असतो. परंतु या ठिकाणी संधी मिळेल किंवा नाही याची खात्री नसल्याने विद्यापीठ स्तरावरील पीएचडीला प्रवेश मिळावा यासाठी अनेक विद्यार्थी 'पेट' परीक्षा देतात. परंतु विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच 'पेट'ची परीक्षा १६ डिसेंबर रोजी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. परंतु यंदा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यानं विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


वेळापत्रक गोंधळ

या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकावरून पुन्हा एकदा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाचा वेळापत्रक गोंधळ समोर आला आहे. यापूर्वी एसवाय बीकॉम आणि सीएची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केला होता. मात्र या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन कराव लागतो, अशी टीका 'नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन'ने केली आहे. त्याशिवाय प्रहार विद्यार्थी संघटना आणि 'आॅल इंडिया नेट अॅण्ड सेट टीचर्स ऑर्गनायझेशन' या संस्थांनी विद्यापीठाच्या वेळापत्रक गोंधळात राज्यपालांनी लक्ष घालावं, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.



हेही वाचा-

पीएचडी प्रवेश परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा